वेदनेचे तीस दिवस, इरशाळवाडीचं चाक पुन्हा रुळावर

Update: 2023-08-22 14:36 GMT

इरशाळवाडी दुर्घटनेला तीस दिवस पूर्ण झालेत. आता लेकरांची किलबिल सुरू झालीय. इरशाळवाडीचं चाक हळूहळू रुळावर यायला लागलं आहे. पण अजूनही आपल्या जवळच्या लोकांना गमावल्याच्या जखमा ओल्या आहेत.

इरशाळवाडी दुर्घटनेला महिना पूर्ण झालाय. आम्हाला सरकारने कपडा लत्ता, भांडी, कुंडी सगळं मिळालंय. पण आता घरं झाल्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही, असं मत महिलेने व्यक्त केलंय.

मी माणगावच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो. माझ्या वडिलांना हॉस्पिटलमधून आणलंय. त्यामुळे मी त्यांना भेटायला आलो असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. सरकारने सगळं दिलंय. पण कुटूंब गेलं त्यामुळे कशातच मन लागत नसल्याचे इरशाळवाडीतील ग्रामस्थाने सांगितले.

इरशाळवाडीत 19 जुलैला दरड कोसळल्याने गावातील 35 घरं गाडली गेली होती. यात 27 जणांचा मृत्यू तर 57 जण बेपत्ता राहिले. यानंतर सरकारने ग्रामस्थांना पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलंय. एवढंच नाही तर ग्रामस्थांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधा मिळाल्या असल्या तरी आमचं दुःख कमी होत नाही. शेवटी सरकारने आम्हाला घरं द्यावीत आणि आमचं पुनर्वसन करावं, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलीय.

इरशाळवाडीचं चाक आता पुन्हा रुळावर येण्यास सुरूवात झाली आहे. पण महिनाभरानंतरही वेदना कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने इरशाळवाडीतील नागरिकांचं पुनर्वसन करून त्यांना पक्की घरं द्यावीत, अशीच मागणी करण्यात येत आहे.


Full View

Tags:    

Similar News