…तर कुत्र्याचे मांसही खावे – दिलीप घोष

Update: 2019-11-06 03:19 GMT

पश्चिम बंगालच्या बरद्वान येथील कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ‘जे गोमांस खातात त्यांनी कुत्र्याचे मांसही खावे’ अस विधान केल आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर त्यांनी मांस खाउ नये तर घरी खावे, काही बुध्दिवाद्य़ांना गायीची माता म्हणून पूजा करणे अपमानकारक वाटते आणि कुत्र्यांची विष्ठी साफ करण्यात अधिक धन्यता वाटते, असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

'गायीच्या दुधात सोने असते, ते तिला सूर्यप्रकाशातून मिळते', 'सोन्याच्या अंशामुळेच गायीचे दूध सोनेरी दिसते', 'परदेशातील गायी म्हणजे गायी नव्हेत, तर त्या केवळ जनावर आहेत', असा बुद्धिप्रमाणवाद त्यांनी मांडला

Similar News