आईला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दोन भावांची धडपड...

आधुनिक श्रावण बाळांनी आईला रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीला जोडणारी लोखंडी हातगाडी तयार केली.

Update: 2021-05-30 08:37 GMT

मुंबई: कोरोनाच्या महामारीत अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहे, त्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने गरजेच्या गोष्टींचा सुद्धा पूर्ण करता येत नाही. औरंगाबादच्या दोन सख्या भावांवर अशीच वेळ आली आहे. आईला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी हतबल झालेल्या, मुलांची ही व्यथा डोळ्यात पाणी आणणारी आहे.

आईला कर्करोगाचे निदान झाले. त्यातच पॅरॅलिसिसमुळे हालचाल करणेही अशक्य झाले. अशा परिस्थितीत आईला रुग्णालयात नियमितपणे घेऊन जावे लागते. मात्र प्रत्येकवेळी रुग्णवाहिकेचं भाडं भरणे अश्यक्य असल्याने हतबल झालेल्या आधुनिक श्रावण बाळांनी आईला रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीला जोडणारी लोखंडी हातगाडी तयार केली.

शनिवारी आईला रुग्णालयात घेऊन जाताना हे दोन्ही भाऊ क्रांतीचौकातून पैठणगेटच्या रस्त्यावर पोहोचले, पण अचानक हातगाडीचे चाक मोडले. त्यामुळे रणरणत्या उन्हात या स्थितीत भररस्त्यावर थांबावे लागले,पण काही लोकांनी परिस्थिती जाणून घेऊन ॲम्बुलन्सची सोय करून दिली.

मात्र, आज मिळाली ॲम्बुलन्स प्रत्येकवेळी मिळणार नाही, त्यामुळे पुढील प्रवास पुन्हा हातगाडीच्या चाकासोबतच असणार आल्याचं दुःख या दोन्ही भावांच्या तोंडावर जाणवत होता.

Full View

Tags:    

Similar News