केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल - प्रीतम मुंडे

Update: 2021-08-30 09:43 GMT

राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपकडून आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्य सरकारकडून इतर आस्थापनांवरील निर्बंध हटवण्यात येत असताना, केवळ मंदिर बंद का? असा सवाल भाजपच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्या बीड येथे आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान बोलत होत्या. फक्त मंदिरावर निर्बंध लादणे आम्हाला मान्य नाही अस देखील यावेळी मुंडे म्हणाल्या.

दरम्यान केंद्र सरकारकडून ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचे, बोललं जात असले तर मग राणेंच्या अटकेचे उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल, ईडी ही केंद्र सरकारची बांधील संस्था नाही. ज्या लोकांविरोधात काही पुरावे मिळाले असतील, म्हणून ही कारवाई केली जात असल्याचे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सोबतच जर राज्य सरकारला असं वाटत असेल की केंद्र सरकार ईडी च्या माध्यमातून सूडबुद्धीने त्यांच्या नेत्यांवर कारवाई करत आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबद्दल देखील त्यांना उत्तर द्यावं लागेल. उगीचच ईडीच्या कारवाई वरून केंद्राकडे बोटं दाखवणं योग्य नाही असं मुंडे म्हणाल्या.

Tags:    

Similar News