बहिष्कार टाकण्याची पोटप्रथा सुरु, मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

Update: 2019-12-15 15:24 GMT

हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेतली. दुपारी भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी चहापानाला जाण्यास नकार दिला होता. “एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमान आहे. पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला चहावर बहिष्कार टाकला” असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे, तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भातला निर्णय लवकरचं घेतला जाईल. त्याचप्रमाणे जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्वांतत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेची भुमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन विरोधकांनी आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये’ असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे. जो कोणी याला जबाबदार असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल.

देशात उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? लोक देशात असुरक्षित आहे. यावरुन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. आमचं मत्रिमंडळ जनतेला बांधील आहे आणि आम्ही वचन पाळणारे आहोत असं मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं

Similar News