महाराष्ट्रातील 2 लाख 63 हजार हेक्टर महार वतन जमीनधारकांच्या समस्या डोंगरापेक्षा मोठ्या

Update: 2023-08-07 09:35 GMT

पुरोगामी महाराष्ट्रात एकही असं गाव नसेल जिथं महार वतनाची जमीन नाही. Bombay hereditary act 1874 नुसार या जमिनी महार समाजातील लोकांना कसण्यासाठी देण्यात आल्या होत्या. पूर्वी १२ बलुतेदारांची परंपरा होती. त्यातला सगळ्यात शेवटचा बलुतेदार म्हणजे महार. महार समाजातील लोकांना या जमिनी दिल्यानंतर त्यांनी त्या कसायच्या आणि येणारं पीक शासन आणि गावकऱ्यांना वाटून झाल्यानंतर उरलेलं पीक स्वतःसाठी ठेवायचं अशी पद्धत होती. याशिवाय त्यांनी शासन आणि गावातील लोकांची सेवा करायची, अशी परिस्थितीत सुरूवातीला होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार वतन खालसा करा व महार वतनदारांना त्यांच्या जमिनी स्वतःला कसू देण्याचा कायदा आणला. मात्र, अजूनही या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या महार वतन जमिनीचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाहीत. महार वतन संवर्धन, संघर्ष समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष संतोष बोकेफोडे यांनी या महार वतन जमिनीच्या संदर्भात मुद्देसूद विश्लेषण केलंय.

Full View

Tags:    

Similar News