नव्या शैक्षणिक धोरणाला संसदेत विरोध केला जाईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांचे आश्वासन

Update: 2022-11-14 10:08 GMT

भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात असताना नाशिकचे छात्रभारती संघटनेचे विद्यार्थी उपस्थित होते. छात्रभारती संघटनेच्या हातात शाळा बंदी निर्णय मागे घ्यावा. शिक्षणावर दहा टक्के कपात कमी करावी. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावे, अशा स्वरुपात फलक राहुल गांधी यांनी पाहिले त्यानंतर राहुल गांधी यांनी छात्रभारती संघटनेच्या विद्य़ार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी छात्रभारती संघटनेने नवीन शैक्षणिक धोरण कसे घातक आहे याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. तसेच रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा असे देखील संघटनेने राहुल गांधी यांच्यासमोर प्रस्ताव मांडला. तसेच शिक्षणाचे वाढत्या प्रमाणात खाजगीकरण होत असल्याने अनेक बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

या सगळ्या समस्या ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील आश्वासन दिले की, नव्या शैक्षणिक धोरणेला काँग्रेसकडून संसदेत विरोध केला जाईल. तसेच शैक्षणिक समस्यांबाबत लोकसभेत मांडण्याचे आश्वासन देखील राहुल गांधी यांनी दिले.

नाशिक येथून सुमारे १८ छात्रभारती संघटनेचे विद्यार्थी भारत जोडो यात्रेत हिंगोली येथे सहभागी झाले होते.

Tags:    

Similar News