कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे ‘मी संभाजी भिडेंच्या तावडीत कसा सापडलो’ हे पुस्तक राज्यात चांगलेच चर्चेत आले होते. या पुस्तकाच्या मुखपृष्टावरून बराच गदारोळ झाला होता. मुखपृष्टावरील संभाजी भिडेंच्या फोटोवरून या पुस्तकावर टीका केली जात होती. जनभावनेचा आदर करत या पुस्तकाचे लेखक जेष्ठ पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांनी त्यावेळी पुस्तकाचे मुखपृष्ट बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या मुखपृष्ठाचा फोटो आता समोर आला आहे.
मुखपृष्ठ फोटो
प्रसिद्ध व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी हे मुखपृष्ठ साकारले आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे..