अध्यक्ष महोदयांनाच, जिथे सभागृहात प्रश्न मांडावा लागतो !!

Update: 2020-02-29 05:55 GMT

सरकारला स्वत: अध्यक्ष महोदयांनाच सभागृहात हतबलतेने प्रश्न मांडावा लागतो असेल तर मग त्या सभागृहाला काय अर्थ राहतो. चर्चांची फक्त औपचारिकता उरली आहे, अशी टीका भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केली आहे.

आमदार फरांदे यांनी सांगितलं की मागच्या सरकारच्या कारकिर्दीत मोजके दोनचारच प्रश्न सभागृहात चर्चेला येत होते. त्यावर सविस्तर चर्चा करता येत होती. पण आता दहा-दहा प्रश्न दर दिवशी येताहेत. चर्चेची फक्त औपचारिकता होतेय. त्यातून परिणाम काहीही साधला जात नाही.

आमदार देवयानी फरांदे यांची अपेक्षा अशी की सभागृहातील चर्चा ठोस निष्कर्षापर्यंत जायला हवी. त्यावर अध्यक्ष महोदयांचे नेमके आदेश व्हायला हवेत. त्या आदेशानुसार विधेयक, कायदा, शासन निर्णयांनी आकार घ्यायला हवेत. तर चर्चेला काही अर्थ आहे. इथे अध्यक्ष महोदयच चर्चेदरम्यान शाळांमधील शैक्षणिक शुल्काचा मुद्दा उपस्थित करतात, पण सरकारला आदेश पारित करीत नाहीत.

Similar News