खडसे आमचे मार्गदर्शक ! - देवेंद्र फडणवीस

Update: 2019-08-25 04:45 GMT

माजी महसुल मंत्री आमदार एकनाथ खडसे हे आमचे व राज्याचे जेष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे की केंद्रात न्यायचे हा निर्णय केंद्रीय नेते घेतील असे वेगळेच संकेत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली तर खडसे यांना मंत्री मंडळात घेणार का? असा प्रश्‍न पत्रकारांकडून विचारला असता ते बोलत होते.

दरम्यान, माजी मंत्री खडसे हे पक्षाचे नेते असतांनाही त्यांच्या मुक्ताईनगरात महाजनादेश यात्रेची जाहीर सभा का वगळण्यात आली. असा प्रश्‍न विचारला असता मतदारसंघातील बोदवड येथून ही जनादेश यात्रा जात आहे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर मतदार संघात प्रचार सभा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Similar News