या मुद्द्यांवर होणार हिवाळी अधिवेशनात गदारोळ...

Update: 2019-12-15 14:19 GMT

नागपूर येथे १६ तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असून हे अधिवेशन १६ ते २१ तारखेपर्यंत सहा दिवस चालणार आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होईल खासकरुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल.

महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचा सातबार कोरा करणं, तसचं शेतमालाला हमीभाव देणं, किमान समान कार्यक्रमात देखील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं. परंतू सत्ता स्थापन झाल्यानंतर १७ दिवस उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला नाही. या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरु शकतात.

अधिवेशनात नागरीकत्व विधेयकाविरोधात देखील चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यातील कॉंग्रेससोबतच्या आघाडीमुळे CAB च समर्थन करायचं की नाही हा शिवसेनेसमोरचा पेच आहे. देशातील अनेक राज्यात या विधेयकाचा विरोध होत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी देखील या विधेयकाचा विरोध केला आहे.

सोबतच आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही बलाकार प्रकरणातील दोषींना त्वरीत शिक्षा मिळावी अशी तरतुद करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपच्या आक्रमकतेचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Full View

Similar News