"एक मराठा, लाख मराठा" म्हणत संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडले.

औरंगाबादमधून पाच वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे रोपटे लावण्यात आले होते. त्याला ९ ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाचे अधिवेशन पार पडले.

Update: 2021-08-20 05:18 GMT

औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला होता. खऱ्या अर्थाने येथूनच मराठा क्रांतिपर्वाची झाली. लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे अतिशय शांततेत पार पडले,औरंगाबाद येथे पार पडलेला मोर्चा विशेष चर्चेत राहिला. आरक्षणासाठी याच परिसरातील काकासाहेब शिंदेच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. ज्या औरंगाबादमधून पाच वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे रोपटे लावण्यात आले होते. त्याला ९ ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती औरंगाबादमध्ये आले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या अधिवेशनाला औरंगाबाद येथून सुरुवात झाली.

यावेळी बोलताना खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील मराठा क्रांती मोर्चा हे महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. 9 ऑगस्ट 2016 ला जगातील पहिला 'मराठा क्रांती मोर्चा' औरंगाबादेत निघाला होता.ज्याने अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान या अधिवेशनात खा. छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा विविध मागण्यांना अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.ज्यात मराठा क्रांती मोर्चा ते सदस्य अभियान राबवणे, गावागावात जाऊन मराठा समाजात जनजागृती करणे, मराठा क्रांती मोर्चा सदस्यांनी राजकीय पक्षांना पाठिंबा देऊ नये, मराठा क्रांती मोर्चा चा वापर राजकीय पक्षाला करता येणार नाही, आलेल्या निधीचा हिशेब समाजाला द्यावा. या मागण्या ठेवण्यात आल्या.

Tags:    

Similar News