‘बैठका’ संपल्या आता सत्तास्थापनेवर ‘जोर’

Update: 2019-11-21 13:16 GMT

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी दिल्लीत सुरु असलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठका अखेर संपल्या. शिवसेनेसोबत जाण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाने अखेर हिरवा कंदील दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या बैठका संपल्या असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.

यावेळी चव्हाण यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते आज मुंबईकडे रवाना होत असल्याचं माहिती दिली. उद्या २२ नोव्हेंबरला हे नेते कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या इतर घटक पक्षांना सत्तेत सहभागी होताना काय सूत्र विचारात घेण्यात आलं आहे. या संदर्भात माहिती देतील. त्यानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये बैठक होऊन सत्ता स्थापनेचा निर्णय जाहीर केला जाईल. “जेव्हा आम्ही समान किमान कार्यक्रम घोषित करु तेव्हाच सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार आहे याची माहिती देऊ,”

काय म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी?

“महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुदुद्यांवर चर्चा पूर्ण झाली असून एकमत झालं आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार असून तिथे निवडणुकीच्या आधी आघाडीसोबत होते त्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. त्यांना आमच्यात झालेल्या चर्चेची माहिती देणार आहोत,”

Similar News