संकटकाळात केंद्र आणि राज्य असा भेदभाव करता कामा नये -एकनाथ शिंदे

केंद्र सरकारने राज्यावर आलेल्या महापूराच्या संकटकाळात भरीव मदत देण्याची गरज आहे. या संकटकाळात केंद्र आणि राज्य असा भेदभाव करता कामा नये. असं मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

Update: 2021-07-31 06:14 GMT

पुणे : केंद्र सरकारने राज्यावर आलेल्या महापूराच्या संकटकाळात भरीव मदत देण्याची गरज आहे. या संकटकाळात केंद्र आणि राज्य असा भेदभाव करता कामा नये. केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून राज्याची जबाबदारी घ्यायला हवी असं मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कोकणात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या भागात येत्या काळात रोगराई -साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी महापूर बाधित गावांना या संकटापासून वाचवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज पूरग्रस्ता भागात कँम्प देखील घेतला जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पूरबाधितांनी सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत असल्याचे सांगतानाच पंचनामे झाल्यानंतर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. असं शिंदे यांनी सांगितले.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात साथीचे आजार येण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेच्यावतीने या भागात आरोग्य शिबीरे घेण्यात येत आहे. ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखान्यामार्फत शिरोळ तालुक्यात आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. तर मुंबईतील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाण्यातील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व राजेंद्र पाटील- यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने निवारा छावणीवर गुरुवारी व शुक्रवारी आरोग्य तपासणी व औषधाचे वाटप करण्यात आले.

Tags:    

Similar News