हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या मालेगावातील अनोख्या यात्रेला सुरूवात

Update: 2024-02-24 14:44 GMT

Nanded : हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारी व दक्षिण मुखी हनुमान(मारोती) मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील मालेगाव येथील यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान दक्षिणमुखी हनुमान मंदिर असणाऱ्या या मंदिराच्या बाजूला मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळ मस्जिद पण आहे. ज्या यात्रेतील पालखी कार्यक्रमाला वर्षांनुवर्षे झाले मुस्लीमही मोठ्या श्रद्धने सहभागी होतात.

या यात्रेचे विशेष म्हणजे यात्रेतील नाटकांची 70 वर्षांची परंपरा असून ही आजतागायत चालू आहे. हा मारोती म्हणजे नवसाला पावणारा आशी आख्यायिका सांगितली जाते. गावातील नागरीक नौकरी, कामधंद्यामुळे कुठेही गेलेले असतील तर ते ह्या यात्रेच्या पालखीला गावात येत असतात. तसेच मारोती मंदिराच्या 10 फुट अंतरावर मस्जिद असून यात अद्याप कोणतेही मतभेद नाहीयेत.

Tags:    

Similar News