चिपी विमानतळ उद्घाटनाला कोणाला बोलवायचं हे संबंधित प्रशासन ठरवेल- सामंत

Update: 2021-09-12 13:11 GMT

चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिराधित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी दिली. त्यासोबत विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही. उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC व पर्यटन विभाग प्रोटोकॉल नुसार बोलवतील. तसेच जे येतील त्यांच स्वागतच आहे. चिपी विमानतळाच्या नामकरण करण्याची मागणी केली असून बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तस प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे असं सामंत यांनी सांगितले.

चिपी विमानतळासंदर्भात आम्हाला कोणतेही श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. अवघ्या २५०० रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे याचा आनंद असल्याचं पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत बोलले. चिपी विमानतळ कोणी सुरु केला हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासीयांना विमानतळ सेवा मिळावा हा हेतू आहे. चिपी विमानतळाला चारी बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी केली आहे. पिंगुळी ते चिपी विमानतळ रस्ता उद्घाटना पर्यंत खड्डे मुक्त करू त्यानंतर यासाठी निधी उपलब्ध आहे.मात्र पाऊस गेल्यानंतर हा रस्ता करणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली सोबतच विनायक राऊत यांनी सुरेश प्रभू त्यांना बोलवलं जाणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात चिपी विमानतळ उद्घाटनावरून रंगलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे आता या उद्घाटन कार्यक्रमावरून नारायण राणे आणि शिवसेना हे पुन्हा आमने- सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags:    

Similar News