भारतीय डाक लिफाफावर “तारप्याची क्रेझ

Update: 2023-08-04 10:54 GMT

पालघर : आदिवासी समाजाचे विशेष वाद्य म्हणून ओळख असणाऱ्या 'तारपा' या वाद्याचे छायाचित्र असलेल्या लिफाफ्याचे अनावरण भारतीय डाक विभागातर्फे करण्यात आले.

आदिवासी वारली चित्र तारपा असलेल्या लिफाफा अनावरण कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर नगरपरिषद मुख्याधिकारी मानिनी कांबळे आदिवासी विकास निरीक्षक, रोहिदास तावडे, आणि सुप्रसिद्ध तारपा वादक भीकल्या धिंडा यांच्या हस्ते लिफाफाचे अनावरण सोहळा करण्यात आले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या भागात आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून तारपा हे वाद्य प्रसिध्द आहे. यामुळे भारतीय डाक विभागाने लिफाफावर तारपा हे वाद्य प्रसिद्ध केले. सदर लिफाफ्याची किंमत २० रुपये आहे. प्रत्येक डाक विभागातील लिफाफावर तारपाचे चित्र असणार आहे.

यावेळी तारपा वादक भीकल्या धिंडा यांनी तारपा वाद्य वाजवून मान्यवरांचे मन प्रफुल्लीत केले. या कार्यक्रमाप्रसंगी जव्हार तालुक्यातील सर्व पोस्ट ऑफिसचे अधिकारी, कर्मचारी, पोस्टमन, पोस्ट विमा प्रतिनिधी, राधा विद्यालय मधील शिक्षक व विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News