TIME Magazine: जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये तालिबानी नेता, कोण आहे 'हा' तालिबानी नेता

Update: 2021-09-18 07:31 GMT

जगप्रसिद्ध TIME मॅगझिनने वर्ष २०२१ मधील जगातील १०० सर्वात पॉवरफुल लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नव्यानं स्थापन झालेल्या तालिबान सरकारमधील उपपंतप्रधान आणि दोहा चर्चेचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार चा समावेश करण्यात आला आहे. अब्दुल गनी बरादर याचा जगप्रसिद्ध TIME मॅगझिनमध्ये समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता तुम्ही म्हणाल दहशतवादी तालिबान संघटनेशी संबधीत असलेल्या अब्दुल गनी बरादरचा जगप्रसिद्ध TIME मॅगझिनने कसा समावेश झाला. त्याची काही कारण आहेत.

यातील महत्त्वाचं कारण म्हणजे तालिबान ने अमेरिकेशी केलेला शांतता करार. अमेरिकेशी झालेल्या शांतता करारादरम्यान मुल्ला बरदार यांनी तालिबानचं नेतृत्व केलं होतं.मुल्ला अब्दुल गनी बरादर हे अफगानीस्तानमध्ये ज्या चार लोकांनी तालिबान आंदोलनाची सुरुवात केली. त्यांच्या पैकी एक आहे. 1994 ला या आंदोलनाची सुरुवात झाली होती. अफगानिस्तान मध्ये सत्ता हस्तातरीत झाल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादर ला अफगाणिस्तानचं उपपंतप्रधान पद दिलं गेलं आहे. वास्तविक त्यांच्याकडे अफगाणिस्तानचं प्रमुख पद दिलं जाईल. असं बोललं जात होतं. मात्र, त्याला उपपंतप्रधान करण्यात आलं.

कोण आहेत मुल्ला अब्दुल गनी बरादर? who is mullah abdul ghani baradar

तालिबानने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड टॉवरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने जेव्हा तालिबानवर हल्ला करत तालिबानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. तेव्हा मुल्ला गनी बरादर यांनी तालिबानची सुत्र आपल्या हातात घेतली. मात्र, मुल्ला अब्दुल गनी बरादरला 2010 मध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याला पाकिस्तानची राजधानी कराचीहून अमेरिका पाकिस्तान यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबरला मुल्ला बरादर ला सोडून दिलं. मात्र, सोडताना त्याला पाकिस्तानात ठेवलं जाईल की, अन्य कोणत्या देशात हे स्पष्ट केलं नाही. मुल्ला बरादर हा तालिबान चा नेता मुल्ला मोहम्मद उमर चा सर्वात भरवश्याचा माणूस मानला जातो.

तालिबान दहशतवाद्यांपैकी मुल्ला बरादर हा अमेरिका आणि अफगान सरकार सोबत चर्चेचं समर्थन करणारा दहशतवादी राहिलेला आहे. त्यामुळं त्यांचं नाव जगप्रसिद्ध TIME मॅगझिनमध्ये झळकलं आहे. भारतातून TIME मॅगझिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पूनावाला यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News