एक रकमी एफआरपीसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू - राजू शेट्टी

Update: 2021-10-03 14:29 GMT

एफआरपीच्या तुकड्याची सुरुवात केंद्र सरकारनेच केली आहे. त्याच्यावर कळस राज्य सरकारनं चढवलेला आहे. केंद्रातील भाजप सरकार असो वा राज्यातील आघाडी सरकार हे दोघेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे सिद्ध झाले आहे. आम्ही दोघांच्याही विरोधात एल्गार पुकारून आमचा घटनादत्त अधिकार आहे तो आम्ही मिळवणारच , आम्ही त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.

तसेच एकीकडे सोयाबीन सारख्या जनुकीय बियाणे वापरलेले पदार्थ विक्री आपल्या देशात होते, मात्र आपल्या देशात जनुकीय बियाणे विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्याची भूमिका घेतली आहे. त्याचे संशोधन करण्यासाठी देखील बंदी आहे. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सांगलीतील मराठा सेवा संघ सभागृहात अग्रणी शिवारच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ.संजय पाटील, संजय बेले आदींसह सभासद उपस्थित होते.

Tags:    

Similar News