Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार अकाउंट

Update: 2020-10-06 05:53 GMT

अभिनेता सुशांत सिंह राजपुत च्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या 80 हजार फेक अकाउंटमधून सोशल मीडियावर सुशांतच्या मर्डर थिअ रीच्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.

विशेष बाब म्हणजे हे फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नाही तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात पोलिस अधिक तपास करत असल्याचं Mumbai police commissioner परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सांगितले. ते India Today या वृत्तवाहिनीवर राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,”

असं सिंह यांनी म्हटलं आहे.

Full View

Similar News