Sushant Singh Case: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि शरद पवार यांच्यात बैठक

Update: 2020-09-10 07:06 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे एक बैठक सुरु आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सुशांतसिंह प्रकरणा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांवर बरीच टीका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी वेळीच एफआयआर दाखल केला नाही असा आरोप मुंबई पोलिसांवर वारंवार केला जात आहे.

दरम्यान हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. यानंतर ईडी आणि एनसीबी देखील या प्रकरणाच्या चौकशीत दाखल झाली. मागिल काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानावत आणि महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाक् यूद्ध सुरु आहे. यामध्ये कुठेतरी सरकारची बदनामी होत असल्याचं चित्र दिसतंय. त्यानंतर शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला असावा. अशी चर्चा आहे.

या बैठकीमध्ये सुशांतसिंह प्रकरणात अद्याप काय चौकशी झाली आहे? याचा आढावा शरद पवार घेणार असल्याचं समजतंय. तसंच हे प्रकरण कसं हाताळायचं याचेही निर्देशही शरद पवार देऊ शकतात.

Similar News