कोस्टल रोड प्रकल्पाला SCचा हिरवा कंदील

Update: 2019-12-17 08:55 GMT

राज्यसरकार आणि मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि मच्छिमारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसत असल्यामुळे कोळीवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि वरळी मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेने हायकोर्टात धाव घेतली होती. यावर हायकोर्टानं 19 जुलैपासून या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. (Mumbai coastal road project)

मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने प्रकल्पावरील स्थगिती हटवण्याचे आदेश दिले.

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम थांबल्यामुळ दररोज 10 ते 14 कोटींचे नुकसान होत असल्याचे महापालिकेनं सांगितले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यामुळे कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाला आहे.

Similar News