सुप्रीम कोर्टाची उ.प्रदेश सरकारला नोटीस

Update: 2020-01-20 06:59 GMT

अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्याच्या निर्णयावरुन सुप्रीम कोर्टानं आज उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावलीये. प्रयागराज नाव ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं योगी आदित्यनाथ सरकारला नोटीस बजावलीये. लोकसभा निवडणुकांच्याआधी २०१८मध्ये उत्तरप्रदेश सरकारनं अलाहाबाद जिल्ह्याचं नाव बदलून प्रयागराज नाव केले होते.

अलाहाबाद हेरीटेज सोसायटीने ही याचिका दाखल केली आहे. याआधी त्यांची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली होती. आज सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्या. बी.आर.गवई आणि न्या. सूर्याकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. अलाहाबाद या नावाला चारशे वर्षांचा इतिहास आहे, कोणत्याही धर्माची व्यक्ती असली तरी दैनंदिन जीवनात लोक अलाहाबाद असाच उल्लेख करतात, त्यामुळे या नावशी शहराची ओळख जोडलेली असल्यानं हे नाव बदलू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

Similar News