अटक करु नका.. चार्जशीट फाईल करु नका: सुप्रिम कोर्टाचे परमवीर सिंगाना संरक्षण

Update: 2021-12-06 10:55 GMT

राज्याचे निलंबित पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्याविरोधात नवं चार्जशीट फाईल करु नका.. अटकेपासून संरक्षण पुढील सुनावणीपर्यंत कायम राहील.. केंद्रीय गुन्हे अन्वेषन शाखा (CBI) ने तपास करावा याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे.

राज्याचे वादग्रस्त पोलिस अधिकारी परमवीर सिंह सहा महीने गायब होते. दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर परमबीर हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सत्र सुरु आहे. सुप्रिम कोर्टानं आदेशात त्यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपल्यानंतर सीबीआयने हा तपास आमच्याकडं द्यावा अशी मागणी केली.

राज्य सरकारनं परमबीर यांच्यावरील आरोप प्रशासकीय दिरंगाईचे असल्यानं ते CAT अंतर्गत येतात. उच्च न्यायालयाने या आधारेच याचिका फेटाळल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोधकुमार जैसवाल महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आहेत. सर्व आरोप आणि घटना त्यांच्याच काळातल्या आहेत. त्यामुळे हा तपसा सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी राज्य सरकारचे वकिल दायरस खंबाटा यांनी केली.

त्यावर सुप्रिम कोर्टानं नव्यानं चार्जशीट फाईल करु नका, तपास सुरु ठेवा. सीबीआयने आठवडाभरात प्रतिज्ञापत्र दाखल करावे पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होईल असं सांगितलं.

Tags:    

Similar News