सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का

Update: 2022-08-16 06:59 GMT

येत्या 19 ऑगस्टला निवडणूक आयोग ठाकरे आणि शिंदे गटाच्या दाव्यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरे गटाने आज लवकरात लवकर सुनावणी घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी दिलेल्या तारखेला होईल असं सांगितलं.

आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी वेळेवर होईल. असं सांगितलं आहे.

शिवसेना कोणाची या दाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगात 19 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी उद्धव ठाकरे यांच्या गोटातून होत आहे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी आपल्या वेळेवर होईल. असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर येत्या 22 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

Tags:    

Similar News