जळगाव विद्यापीठाच्या वेबसाईटवर "आंबेडकर विचारधारा"हा विषयच नसल्याने विद्यार्थी आक्रमक

Update: 2021-10-23 03:02 GMT

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "आंबेडकर विचारधारा" हा विषय पोष्ट ग्रॅज्युएशन पर्यंत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या विषयात ज्यांना पी.एच.डी. करायाची आहे, त्यांना PET ही परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर हा विषयच नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी.करायाची आहे. त्यांना ही परीक्षाच देता येणार नाही.यामुळे या अन्यायाविरोधात "भारतीय विद्यार्थी मोर्चा"ने विद्यापीठात भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष

मुकेश सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन कुलगुरुंना निवेदन दिले आहे.यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सतिष बि-हाडे,अक्षय बाविस्कर,विशाल बैसाणे,दिपाली पेंढारकर,मयुर साळवे, जितेंद्र वानखेडे आदिसह कार्यकर्ते व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान भारतीय विद्यार्थी मोर्चाची मागणी मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबर रोजी विद्यापीठात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुकेश सावकारे यांनी दिला

Tags:    

Similar News