अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सर्व १८ पुर्नविचार याचिका

Update: 2019-12-12 12:02 GMT

अयोध्या वादग्रस्त (Ayodhya Verdict) जमीन प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या १८ पुर्नविचार याचिकांवर सुप्रीम कोर्टात गुरूवारी सुनावणी करण्यात आली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. या खंडपीठात न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस.ए. नजीर, न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड़ आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांचाही समावेश होता.

सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीवर राममंदीर (Ram Mandir) बांधण्याची परवानगी देत मुस्लिम पक्षाला मस्जिद बांधणीसाठी ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर पुर्नविचार व्हावा म्हणुन १८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी बहुतांश याचिका या मुस्लीम पक्षाकारांमार्फत दाखल केल्या गेल्या. निर्मोही आखाडामार्फतही बुधवारी पुर्नविचार याचिका दाखल केली. राममंदीर प्रकरणात आपलीही भुमिका स्पष्ट करावी अशी निर्मोही आखाड्याची मागणी होती.

Similar News