कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवा, केंद्र सरकारचा बाबा रामदेवांना धक्का

Update: 2020-06-23 15:58 GMT

बाबा रामदेव यांच्या पतंजलीमार्फत कोरोनावरील औषध विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात करण्यात आली आहे. बाबा रामदेव यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर हे औषध प्रभावी असल्याचा दावा केला. तसेच काही रुग्णांवर या औषधाची यशस्वी चाचणी केल्याचा दावा देखील बाबा रामदेव यांनी केला होता. पण काही

तासातच केंद्र सरकारने बाबा रामदेव यांच्या या औषधाला स्थगिती दिलेली आहे. पतंजलीने या औषधाची जाहिरात थांबवावी असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत.

कोरोनाच्या या संकटावर संपूर्ण जग औषध शोधत असताना बाबा रामदेव यांनी अचानक कोरोनावर प्रभावी आयुर्वेदिक औषध शोधून काढल्याचा दावा केला. पण काही तासातच आयुष मंत्रालय आणि ICMR ने या प्रक्रियेत आपण कुठेही सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पतंजलीने या औषधांच्या केलेल्या दोन पातळीवरील चाचण्यांबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आलेल आहे. पतंजलीने औषधाची नावे आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती द्यावी असे आदेश देखील आयुष मंत्रालयाने दिलेले आहेत. त्याच बरोबर एखाद्या आजारावरील औषध तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेचे पालन केलं गेलं आहे का याची देखील माहिती देण्याचे आदेश मंत्रालयाने पतंजलीला दिलेले आहेत कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवा, केंद्र सरकारचा बाबा रामदेवांना धक्का

Similar News