अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीचं वक्तव्यं; Electoral Bonds हा जगातील सर्वात मोठा घोटाळा

Update: 2024-03-27 08:22 GMT

इलेक्टोरल बाँड्सबाबतचा (Electoral Bonds)वाद सातत्याने वाढत असून, विरोधक या मुद्द्यावर सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी आज एका खाजगी वाहिनीशी बोलताना सांगितले की, इलेक्ट्रोरल बाँड हा केवळ भारताचाच नाही तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. परकला प्रभाकर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ अनेक विरोधी पक्षांनी शेअर केला आहे. पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X(X Handle) वर शेअर करून सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

देशभरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांनी राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. काही कंपन्यांनी त्यांच्या नफ्यापेक्षा जास्त रक्कम राजकीय पक्षांना दिली आहे; भाजपला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत.

देशभरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांनी राजकीय पक्षांना(Political parties) इलेक्टोरल बाँड्सच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. काही कंपन्यांनी त्यांच्या नफ्यापेक्षा जास्त रक्कम राजकीय पक्षांना दिली आहे; भाजपला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत.

Tags:    

Similar News