स्टार्टअप इंडिया योजना फसली – अर्थमंत्री

Update: 2020-02-01 06:53 GMT

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया ही योजना फसल्याची कबुली दिलीये. कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी ५ नवीन स्मार्ट सिटींची घोषणा त्यांनी केली. उद्योजकांना गुंतवणूकीसाठी स्वतंत्र सेलची उभारणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

प्रत्येक व्यावसायिकाला अर्थसहाय्य करण्यासाठी वैयक्तिकरित्या मदत केली जाणार आहे, तसंच यासाठी पोर्टलदेखील तयार केले जाणार आहे. स्टार्टअप इंडिया आणि याच्याशी संबंधित योजनांचा हेतू साध्य़ झाला नसल्याचं सांगत सरकारनं नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Similar News