आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची अट, मी नेतृत्व करेन पण...

Update: 2021-11-11 08:32 GMT

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्याने संपाचं हत्यार उपसल्याने लोकांचे मोठे हाल होत आहे. महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा. अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, सरकारने यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला आहे.

आज या एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. या संदर्भात राज यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना एक अट घातली आहे. ते म्हणाले 'मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा. तरच मी या आंदोलनाचे नेतृत्व करेल. मी सरकारसोबत बोलेल त्यानंतर पुढे काय करायचं हे मी कर्मचाऱ्यांना सांगेन, आत्महत्या करू नका. आत्महत्या हा उपाय नाही. मनगटात बळ असताना अर्धवट लढाई सोडून जायचं नाही. असं आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

आत्तापर्यंत सरकारने 800 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून काही आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

Tags:    

Similar News