गरीबांसाठी सोनिया गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती...

Update: 2020-06-23 02:15 GMT

लॉकडाऊनमुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालेल्या गरिबांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

कोरोनामुळे देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेक मजूर आणि कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी सरकारने या लोकांना धान्य उपलब्ध करून दिले.

पण लॉकडाऊनची मुदत पुढे वाढली आहे आणि यानंतरही काम मिळेल की नाही असा प्रश्न या गरिबांपुढे उभा राहिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी सोनिया गांधी यांनी केलेली आहे.

हे ही वाचा..

संघर्ष: दोन वर्षाचा चिमुकला जेव्हा कोरोनाशी दोन हात करतो…

संघर्ष: दोन वर्षाचा चिमुकला जेव्हा कोरोनाशी दोन हात करतो…

देव तारी त्याला कोण मारी? कोविड रुग्णालयात महिलेने दिला बाळाला जन्म

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गरिबांना दर महिन्याला पाच किलो धान्य उपलब्ध करून द्यावं आणि सप्टेंबरपर्यंत ही तरतूद कायम करण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे लाखो गरिबांवर दारिद्र्यरेषेच्या खाली जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांना सरकारच्या मदतीची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Similar News