पुत्र नील सोमय्या अडचणीत, पिता किरीट सोमय्या दिल्लीकडे रवाना

Update: 2022-02-25 11:11 GMT

 ईडीने नवाब मलिकांवर कारवाई केल्यानंतर आता राज्य सरकारही उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे एफआय आर दाखल होण्यापूर्वी नील सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.या दरम्यान किरीट सोमय्यांनी दिल्ली गाठली आहे.

कमी भावात जमीन विकत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊता यांनी केला होता. त्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांच्या हालचाली वाढल्या आहेत. आज मुंबई सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे.मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे नील यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आता कोणती कारवाई करतात, याची उत्सुकता आहे. दरम्यान, अटक होण्याची शक्यता असल्याने नील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण होताच ते दिल्लीला रवाना झाले आहेत.ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपूरावा करणयासाठी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. निकॉन फेज 1 फेज 2 हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. हरित लवादाने यात लक्ष घातल्यास दोनशे कोटींचा दंड होऊ शकतो. यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब लक्ष घालावे, असे माझे आवाहन आहे. सगळ्या प्रकल्पाचे परवाने रद्द करावेत. पीएमसी गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट अन् नील सोमय्याला ताबडतोब अटक करावी, असेही राऊत म्हणाले होते.

Tags:    

Similar News