नुपूर शर्मांविरोधात MIMने काढलेल्या मोर्चामध्ये हिंसा, गुन्हा दाखल

Update: 2022-06-11 13:49 GMT

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरात अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आंदोलन केले. पण काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. सोलापूरमध्येही एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चा प्रकरणात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह एकूण 10 जणविरोधात गुन्हा नोंदण्यात आला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे भंग केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात भांदवि कलम 143, 147, 188, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनीही औरंगाबादमध्ये मोर्चात सहभागी लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. अल्ट न्यूजचे मोहम्मज झुबेर यांनी एक व्हिडिओ ट्विट करत इम्तियाज जलील यांचे वक्तव्य प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये जलील हे शेकडो लोकांसमोर नुपूर शर्मा यांचा फोटो हातात घेऊन त्यांना फाशी द्यायची असेल तर औरंगाबादमध्ये भरचौकात फाशी द्या अशी मागणी करत आहे. पण हे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

Full View
Tags:    

Similar News