निर्भयाला न्याय मिळाला, अण्णा हजारेंचं मौन व्रत मागे

Update: 2020-03-20 05:12 GMT

निर्भयाच्या दोषींना शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता फाशीची शिक्षा देण्यात आली. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा लवकर व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन व्रत धारण केलं होतं. निर्भया प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं मौन व्रत सोडण्याचा निर्णय घेतला. निर्भयाच्या आरोपींना फाशी मिळावी म्हणून अण्णा हजारे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून मौनव्रत धारण केलं होतं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 20 डिसेंबर पासून त्यांनी मौन व्रत धारण केलं. या पत्रात त्यांनी देशातील वाढते महिला अत्याचार, न्यायव्यवस्थेत महिलांना न्याय मिळण्यासाठी होणारा विलंब, निर्भयाच्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेत होणारा विलंब, आंध्रप्रदेशातील बलात्कार आणि खून प्रकरण, उन्नाव प्रकरण या कारणांमुळे त्यांनी मौन व्रत धारण करत असल्याचा उल्लेख केला होता. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अण्णा हजारें आपलं मौन व्रत सकाळी 10 वाजता सोडलं आहे.

Similar News