शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार?

Update: 2023-01-17 05:22 GMT

संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं एका निर्णयाकडे लक्ष लागून आहे. आपल्याला माहित आहे राज्यात मागच्या काही महिन्यांपूर्वी काय राजकारण घडलं. ६ महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत.

आता शिवसेनेत दोन गट पडल्या नंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धान्यष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून वाद निर्माण झाला. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राज्यात जो सत्ता संघर्ष सुरु आहे त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. आजच्या सुनावणी ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार?

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचे दावे केले जात आहेत. त्यात विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. याबाबतही आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News