एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण...

Update: 2020-09-24 09:19 GMT

शिवसेनेचे आघाडीचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ‘मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...’

दरम्यान राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू मंत्र्यांना कोरोना ची लागण झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Similar News