आरे कारशेड समितीचा अहवाल बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे

Update: 2020-01-29 10:51 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सत्तेत येताच आरे कारशेडला (Aarey Carshed) स्थगिती दिली आणि अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांच्यासह चार अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. मुंबईतील मेट्रो 3 चं कारशेड इतर ठिकाणी हलवता येणं शक्य आहे का? या संदर्भात अहवाल या समितीला द्यायचा होता. या समितीने आपला अहवाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला सोपवला आहे.

मेट्रोचं कारशेड दुसरीकडे हलवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचं या समितीने म्हटलं आहे. आरे वगळता इतर ठिकाणी कारशेड हलवल्यास खर्च वाढेल. यामुळे सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडेल असं समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांनी समितीचा अहवाल मंगळवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला. 33.5 किमीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाचं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार…

Similar News