कर्नाटक : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरण; लिंगायत समाजाचे गुरू शिवमुर्ती यांना अटक

लिंगायत समाजाच्या चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती असलेल्या शिवमुर्ती मुरगा शरनरू यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्या आरोपानंतर कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवमुर्ती यांना अटक केली आहे.

Update: 2022-09-02 03:59 GMT

कर्नाटकमधील चित्रदुर्ग या मठाचे मठाधिपती असलेल्य शिवमुर्ती मुरगा शरनरू यांनी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवमुर्ती यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. या प्रकरणात शिवमुर्ती यांना गुरूवारी रात्री अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

लिंगायत समाजाच्या चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती असलेल्या शिवमुर्ती मुरगा शरनरू यांच्या मठाच्या माध्यमातून चालत असलेल्या शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये 1 जानेवारी 2019 ते 6 जून 2022 या कालावधीत लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर संबंधीत मुलींना एका सामाजिक संस्थेची मदत घेत कोट्टनपेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर तेथील पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने पीडित मुलींनी म्हैसूरच्या नाझारबाद पोलिस ठाण्यात स्वामी शिवमुर्तींविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शिवमुर्ती मुरगा शरनरू मठातून पळून गेल्याची चर्चा होती. मात्र गुरूवारी रात्री अखेर पोलिसांनी स्वामी शिवमुर्ती यांना अटक केली.

आपण निर्दोष असून हे आरोप आपल्याविरोधातील कुभांड आहे. त्यामुळे आपण लवकरच निर्दोषत्व सिध्द करू, असं शिवमुर्ती यांनी म्हटलं आहे.

आज होणार सुनावणी

स्वामी शिवमुर्ती यांना अटक केल्यानंतर चित्रदुर्ग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र शिवमुर्ती यांच्या अटकेनंतर कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News