शिवसेना पश्चिम बंगाल लढणार

Update: 2021-01-17 14:10 GMT

शिवसेना पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भातली घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. तसंच आपली भेट लवकरच कोलकात्यात होईल असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत या निवडणुकीत पाहण्यास मिळते आहे. आता या निवडणुकीत शिवसेनेनेही उडी घेतली आहे. त्यामुळे पुढे काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेने किती जागा लढवणार? उमेदवार कोण असतील हे अद्याप जाहीर केलेलं नाही. मात्र पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपला या ठिकाणीही शिवसेनेशी 'सामना' करावा लागणार असं सध्या तरी दिसतं आहे.

Tags:    

Similar News