अजित पवार राजकारण सोडणार? शरद पवारांच्या प्रतिक्रीयेनंतर चर्चांना पुन्हा उधाण

Update: 2019-09-27 15:40 GMT

अजित पवारांनी ( Ajit Pawar Resigns) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी प्रतिक्रीया दिलीय. पुण्यामध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार यांनी “अजित पवारांनी राजीनाम्याविषयी काहीच चर्चा केली नाही. पण कुटुंबप्रमुख म्हणून माहिती घेणं माझी जबाबदारी होती म्हणून मी त्यांच्या कुटुंबाकडून माहिती घेतली. शिखर बँक प्रकरणात माझं नाव आल्याने अजित पवार अस्वस्थ होते. त्यांनी आपली अस्वस्थता आपल्या कुटुंबाला बोलून दाखवली. आम्ही पदाधिकारी असलेल्या सरकारी बँकेच्या कारभारामुळं सदस्य, सभासद नसताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे याचा अजित पवारांना त्रास होत होता” असं शरद पवार यांनी सांगितलं.

राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ५२ वर्षे विधिमंडळाच्या राजकारणात घालवलेल्या व्यक्तीवर असे आरोप होत असतील तर या क्षेत्रात काम करायची इच्छा नसल्याचंही अजित पवारांनी आपल्या कुटुंबाला बोलून दाखवलं. मुलगा पार्थनेही राजकारणात येऊ नये अशी अजित पवारांना वाटत आहे असं शरद पवार म्हणालेत.

मात्र, कुटुंबप्रमुख म्हणून या प्रकरणात लक्ष घालणार असून अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलंय. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते सध्या नॉट रिचेबल आहेत.

Similar News