एकनाथ खडसेंची जंगी तयारी, शरद पवारांचा खान्देश दौरा रद्द...

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिला दौरा रद्द, काय आहे कारण?

Update: 2020-11-17 03:08 GMT

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार यांचा पहिलाच उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द झाला आहे.Pawar's

खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेशाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच राष्ट्रवादी मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार खान्देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, शरद पवार यांना त्यांचा दौरा अचानक रद्द करावा लागला आहे. यामागचं कारण देखील आता समोर आलं आहे.

खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे देखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे पवारांनी हा दौरा अचानक रद्द केल्याचं बोललं जात आहे.

Tags:    

Similar News