'...मग जीएसटीचे राज्याचे 35 हजार कोटी रुपये कसे थकवता?' - शरद पवार

Update: 2021-10-16 12:01 GMT

पुणे :  राज्य सरकारने 3 हजार कोटी रुपये थकवले म्हणून कोळसा पुरवठा केला जात नाही. मग जीएसटीचे राज्याचे 35 हजार कोटी रुपये कसे थकवता? असा सवाल करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यावर दोषारोप करणं हे योग्य नाही, असं म्हटले आहे

कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. पण केंद्र सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकारकडून कोळसा पुरवठा करण्यासाठीचे 3 हजार कोटी रुपये आले नाही. म्हणून केंद्राला अडचणीला तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे कोळसा पुरवठा करण्यात आला नसल्याचं त्यांनी म्हटले. त्यावर पवार यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. मी याबाबतची माहिती घेतली, 3 हजार कोटी देणं आहे हे खरं आहे. त्यातील 1400 कोटी रुपये आज किंवा उद्या सरकार देणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला जीएसटीची 35 हजार कोटीचं देणं केंद्राकडे आहे. ते देत नाही. आणि तीन हजार कोटीसाठी कोळसा पुरवठा करायचा नाही. हे चुकीचे आहे असं पवार म्हणाले.

Tags:    

Similar News