शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

नव्या संसदभवनाच्या उद्घाटनावरून देशात राजकारण चालू आहे. १९ पक्षांनी या उद्धघाटन सोहळ्यावर बहिष्कार देखील टाकला आहे. मात्र शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Update: 2023-05-28 09:04 GMT

शाहरुख खान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत नव्या संसद भवनाचे कौतुक केलं आहे. भारताचे नवीन संसद भवन आपल्या उज्वलतेचे प्रतीक आहे. संसद भवन फक्त संसद भवन नसून 140 करोड भारतीयांचे घर आहे . भारतातील प्रत्येक राज्य ,जिल्हे , गाव आणि सर्व जाती धर्मांच्या नागरिकांचे हे घर आहे. ह्या घराची नजर प्रत्येक भारतीयांवर आहे. आणि त्यांच्या हितासाठी हे घर कायम भक्कमपणे उभे राहील. आम्हा भारतीयांसाठी सत्यमेव जयते हे फक्त ब्रीदवाक्य नसून आमची आन बाण आणि शान आहे. असे बोलून 140 करोड भारतीयांना शुभेच्छा देऊन जय हिंद देखील म्हणाले आहेत.

अभिनेता अक्षय कुमार काय म्हणाले? 

नवीन संसद भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे . मी जेव्हा दिल्ली मध्ये राहत होतो तेव्हा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातमध्ये अनेक इंग्रजांनी बांधलेल्या मोठ्या इमारती होत्या. पण आज मला नवीन संसद भवन पाहून खूप गर्व होत आहे. संसद भवनांचे उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप शुभेच्छा.

Tags:    

Similar News