करोना लसनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालावरची बंदी उठवा : अदर पुनावाला यांची जो बायडेनकडे विनंती

Update: 2021-04-16 15:47 GMT

देशात करोना विषाणूने प्रकोप केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लस आणि ऑक्सिजनचा तुटवडा अनेक राज्यात निर्माण होत आहे. सगळी परिस्थिती भयावह करणारी आहे. देशात लसीकरणावरुन सुरु असलेला गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. कारण लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही माहिती सीरम इन्स्टिट्युट सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. करोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिका आणि युरोप मधून येतो परंतु तेथील सरकारने करोना लसीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला करोना लस तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्युट सीईओ अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ट्विट टॅग करत कच्चा मालावरची बंदी उठवण्याची विनंती केली आहे.

ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, "आदरणीय जो बायडेन…जर आपण खरंच करोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे".

Tags:    

Similar News