कोरोनावरील लस, केंद्राला ‘80 हजार कोटीं’चा सवाल

Update: 2020-09-26 14:29 GMT

कोरोनावरील लस आल्यानंतर त्या लसीचे डोस खरेदी करण्याकरीता आणि प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढील वर्षात 80 हजार कोटी रुपये आहेत का? असा सवाल अदर पुनावाला यांनी विचारला आहे. अदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत.

तसंच कोरोनावरील ऑक्सफर्डच्या सर्वाधिक चर्चेतील लसीच्या निर्मितीमध्ये सिरम इन्स्टिट्यूचाही सहभाग आहे. त्यामुळे अदर पुनावाला यांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे आता नवीन चर्चेला सुरूवात झाली आहे. अदर पुनावाला यांनी सोशल मीडियावर हा सवाल उपस्थित करत पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.

“कोरोनावरील लसीच्या खरेदीसाठी आणि देशातील प्रत्येकाला लस देण्यासाठी सरकारकडे पुढच्या वर्षाकरीता 80 हजार कोटी आहेत का? कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याची गरज भासेल. पुढील सगळ्यात मोठे आव्हान हेच आहे.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अदार पुनावाला यांनी हा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून का उपस्थित केला अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

Similar News