गौरी लंकेश हत्येचा मुख्य आरोपी अटकेत

Update: 2020-01-10 03:20 GMT

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश देवडीकर याला पोलीसांनी अखेर अटक केली. आरोपी ह्त्येनंतर फरार होता. अखेर गौरी लंकेश ह्त्येचा तपास करत असलेल्या विशेष पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनाबाद जिल्ह्यात कतारास येथून आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपी हा मूळचा औरंगाबादचा असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कतरासमधील व्यापारी प्रदीप खेमका यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर ऋषिकेश काम करत होता. त्याने आपली ओळख लपवली होती. वेगळ्याच नावाने तो तिथे वावरत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवले. आरोपी जिथे वास्तव्याला होता त्या घराची झडती घेतली जात असून त्यात काही महत्त्वपूर्ण दस्तावेज व माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा...

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना

मुलीच्या छेडछाडीचा आरोप असलेले DIG मोरे निलंबित…

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अखेर मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Similar News