सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? दिल्लीतले काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने

Update: 2019-11-12 07:38 GMT

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीत सोनिया गांधी(sonia gandhi) यांच्या निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. सोनियांशी चर्चा करून काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आज राज्यात येत आहेत आणि मुंबईत ते शरद पवार(shard pawar) यांची भेट घेणार आहेत.

हे ही वाचा :

सामान्यांच्या आकलनापलिकडचं सत्तेचं राजकारण !!!

संजय राऊत लीलावती रुग्णालयात; अँजिओग्राफी होण्याची शक्यता

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी अधिकृत प्रस्ताव

 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल, अहमद पटेल हे विशेष विमानाने मुंबईत दाखल होत आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पक्षाच्या इतर नेत्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का आणि द्यायचा असेल तर त्याचं स्वरूप कशाप्रकारे असेल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे आज रात्री ८.३० वाजेपर्यंत सत्तेचा दावा करण्याची मुदत आहे. त्याआधी या नेत्यांची बैठक संपेल आणि अंतिम निर्णय समोर येईल असं अपेक्षित आहे.

Similar News