नबाब मलिकांनीच 'गोपनीय अहवाल' फोडला : फडणवीस

Update: 2021-03-26 09:52 GMT

मी पोलिस विभागातील बदल्यांच्या घोटाळ्याच्या दोन पानाचं पत्र मिडीयाला दिलं होतं, आणी अहवाल पेन ड्राइव्ह मधून केंद्रीय गृहसचिवांना दिला. अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी तर संपूर्ण अहवालच जाहीर केला आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे सरळमार्गी असून मंत्र्यांनी अहवाल तयार करुन त्यांची सही घेतली असेल, अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केली आहे.

पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दोषी ठरवण्याऱ्या मुख्य सचिवांच्या अहवालावर बोलताना फडणवीस म्हणाले, कुंटे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहे. त्यांनी हा रिपोर्ट तयार केलाच नाही. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असेल आणि त्यावर कुंटे यांनी सही केली असेल. असाच हा अहवाल आहे.

तसे नसते तर या अहवालत प्रचंड चुकी आढळल्याच नसत्या, असंही त्यांनी सांगितलं. या अहवालात अनेक चुका आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो, असं म्हटलं आहे. परंतु या अहवालात फोन टॅपिंगचं आणखी एक कारण दडवून ठेवलं आहे. एखादा गुन्हा घडणार असेल किंवा मोठा भ्रष्टाचार होणार असेल तरीही फोन टॅपिंग केली जाते, हे या अहवालत नमूद करण्यात आलेलंच नाही, असं फडणवीस म्हणाले. या प्रकरणात आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत आम्ही कोर्टात पुरावे देऊ असंही फडणवीस शेवटी म्हणाले.

काल मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आज फोन टॅपिंग अहवाल लीक झाल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई सायबर सेल कडून गुन्हा दाखल केला आहे.

Tags:    

Similar News