उदयनराजेंच्या घाईघाईने झालेल्या पक्षप्रवेशाचं सिक्रेट

Update: 2019-09-14 13:29 GMT

उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर शनिवारी त्यांचा भाजपात पक्षप्रवेश ही झाला.

शुक्रवारी विशेष विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील हे उदयनराजेंना घेऊन दिल्ली ला गेले. रात्री एक वाजता सर्वजण दिल्ली ला पोहोचले. त्यानंतर रात्री दीड वाजता उदयनराजेंनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर शनिवारी सकाळी अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांचा भाजपा मध्ये प्रवेश झाला. या प्रवेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली नाही. त्यामुळे या प्रवेशाच्या घाईबाबत चर्चा सुरू झाली.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या होमग्राऊंड बारामती मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचणार होती. ही यात्रा बारामतीत पोहोचण्याआधी उदयनराजे यांचा पक्षप्रवेश करवून घेणं गरजेचं होतं. उदयनराजें यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेससाठी झटका असल्याने बारामतीच्या दौऱ्याच्या दिवशीच तो व्हावा असं टायमिंग साधण्यासाठी अत्यंत घाईघाईने या घडामोडी घडवण्यात आल्या.

Similar News